Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Politics: बालेकिल्ल्यातच शरद पवारांना मोठा धक्का, माढ्यातला शिलेदार शिंदे गटाच्या वाटेवर

NCP Sharad Pawar Group: सोलापूरमधील माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला. माढ्यातील बडा नेता अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. आजच याचा पक्षप्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Priya More

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते आणि पदाधिकारी महायुतीमधील पक्षात प्रवेश करत आहे. असे असताना आता शरद पवारांना बालेकिल्ल्यामध्येच मोठा धक्का बसला आहे. माढ्यातील महत्वाचा शिलेदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय कोकाटे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला. कोकाटे यांच्या या राजीनाम्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कोकाटे यांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर कोकाटे हे नाराज झाले होते.

विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटे यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले होते. परंतु संजय कोकाटे यांनी आता पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कोकाटे आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.

संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिट्टी दिल्यामुळे माढ्यात पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. संजय कोकाटे यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे माढ्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT