Sharad Pawar meets Deputy CM Eknath Shinde at the Assembly, triggering reactions across political parties in Maharashtra. Saam tv
महाराष्ट्र

पवार शिंदे-भेट, ठाकरेसेना दुखावली, शिंदेंच्या दालनात पवारांच्या आमदारांची बैठक

Sharad Pawar Eknath Shinde Meeting Maharashtra Political Row: शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. दुसरीकडे पवार- शिंदेंच्या भेटीनं ठाकरेसेना चांगलीच दुखावलीय... खासदार संजय राऊतांनी पवार- शिंदे भेटीवर केलेलं विधान राष्ट्रवादीच्या कसं जिव्हारी लागलंय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. विधानभवनाच्या दालनात झालेल्या एका भेटीनं मविआतलं अंतर्गत राजकारण चांगलंच तापलंय. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच खुद्द शरद पवारांनीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली... विशेष म्हणजे शरद पवारांनी शिंदेंच्याच दालनात पक्षाच्या आमदारांची बैठकही घेतली... त्यामुळे शिंदेंसोबतच्या भेटीनंतर मविआत वादाची ठिणगी पडलीय...गद्दारांना प्रतिष्ठा दिल्यानं ठाकरेसेना दुखावलीय. आणि ठाकरेसेनेनं जाहीरपणे ही नाराजी व्यक्त केलीय. मात्र यावर पवारांच्या राष्ट्रवादीनं तीव्र आक्षेप घेतलाय.

ठाकरेसेनेनं केवळ भेटीवर नाराजी व्यक्त न करता थेट पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मात्र ठाकरेसेनेची ही भूमिका काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेसनं या भेटीचं जाहीर समर्थन केलंय.

पवारांच्या विश्वासार्हेतेवर ठाकरेसेनेचं प्रश्नचिन्ह

दुसरीकडे येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना दिसेल”, असे सूचक वक्तव्य शिंदेसेनेचे मंत्री योगेश कदमांनी केलयं...

शरद पवारांची भूमिका अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रम निर्माण करणारी असल्याची चर्चा नेहमीच चर्चा रंगत असते. 2019 ला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा अनपेक्षित प्रयोगही शरद पवारांनीच घडवून आणला होता. त्यामुळे असंच काही वेगळ राजकीय समीकरण नजीकच्या काळात पाहायला तर मिळणार नाही ना? अशी उत्सुकता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात निर्माण झालीय़.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT