Chhagan Bhujbal Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा एकाच मंचावर हास्यसंवाद, क्षणभरात नेमकं काय बोलणं झालं?

Maharashtra: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती.

Saam Tv

Maharashtra Politics: छगन भुजबळ मागील काही दिवसांपासून आपल्याच पक्षावर नाराज आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात संधी न दिल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन ते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्यात चर्चाही झाली. मंत्रिपद न दिल्याने नाराज भुजबळ पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच त्यांची एका सोहळ्यात शरद पवार यांच्याशी भेट झाली. काही वेळाच्या अबोल्यानंतर पवार आणि भुजबळ यांच्यात काही सेकंदांचा संवाद झाला. मंचावर ते एकमेकांकडे पाहून हसू लागले. या प्रसंगावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पुतळ्यांचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होते, तर छगन भुजबळांकडे सोहळ्याचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तेव्हा दोघेही सोहळ्याला उपस्थित राहणार हे नक्की होते. यामुळे नाराजी प्रकरणानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ समोरासमोर येणार होते.

अनावरण सोहळ्याला चारच्या सुमारास शरद पवार यांनी हजेरी लावली. भुजबळाच्या आधीच ते येऊन बसले. पुढे दीड तासाने छगन भुजबळ सोहळ्याला पोहोचले. वेळेला महत्व देणाऱ्या पवारांना साहजिकच थोडा का होईना राग आला असेल याची कल्पना भुजबळांना होतीच. त्यामुळे मंचावर आल्यापासून भुजबळांनीही बोलणे टाळले. थोड्या वेळात शरद पवारांनी पुढाकार घेत भुजबळांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

एकाच मंचावर आल्यानंतर सुरुवातीला शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात संवाद झाला नाही. पुढे पवारांनी त्याच्या हातातील पत्रिकेवर दोन ओळींचा मजकूर लिहिला आणि आपल्या हातातली पत्रिका भुजबळाच्या हाती सोपवली. मग त्यांनी भुजबळांना खुणावले. त्यानंतर वीस मिनिटांनी त्यांच्यात काही सेकंदांचा संवाद झाला. ते एकमेकांना पाहून हसले. मंचावर सुरु असलेला प्रसंग पाहून चर्चांना उधाण आले असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या मेळघाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात,दोन मजुरांचा मृत्यू

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

SCROLL FOR NEXT