Ganpatipule, Ratnagiri Ganeshotsav, Ganesh, Ganpati saam tv
महाराष्ट्र

Ganpatipule : ...अन् मयेकर देवासारखे धावून गेले; गणपतीपुळ्यातील समुद्रात बुडताना नांदेडच्या गणेशभक्ताचा वाचला जीव

राज्यभरातील गणेशभक्त आज गणपतीपुळेत दाखल झाले आहेत.

अमोल कलये

Ganpatipule News : राज्यभरात गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थी निमित्त आज रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील गणपतीपुळे (ganpatipule) येथे गणेश मंदिरात राज्यभरातील गणेशभक्त आले आहेत. दरम्यान आज दुपारच्या सुमारास एका पर्यटकास समुद्रातून बूडताना वाचविण्यात यश आलं आहे.

रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात देशाच्या कानाकोप-यातून गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक आले आहेत. आज पहाटेपासून या ठिकाणी पूजा अर्चा सुरु आहे. गणेश चतुर्थी असल्याने श्रीक्षेत्र गणपतीपुळेत गणेश भक्तांची आज खूप माेठी गर्दी झाली आहे. प्रत्येक भाविकास दर्शन मिळेल अशी शिस्तबद्ध व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे.

दरम्यान गणपतीपुळे येथील समुद्रात आज एका बुडणा-या पर्यटकाला वाचवण्यात यश आलं आहे. गुलशन राठोड असं पर्यटकाचे नाव आहे. ताे नांदेडमधील रहिवासी आहे. गुलशन बुडत असताना लाेकांनी मदतीसाठी हाक दिली. त्याचवेळी शरद मयेकर यांनी जीवाची पर्वा न करता खाेल समुद्रात जाऊन गुलशनला वाचवले.

दरम्यान गणपतीपुळेत पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे येथे जीव रक्षक असणे गरजेचे आहे असं काही पर्यटकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT