jayant patil , shambhuraj desai , satara , maharashtra government
jayant patil , shambhuraj desai , satara , maharashtra government saam tv
महाराष्ट्र

Satara : जयंत पाटलांच्या 'त्या' भविष्यवाणीवर शंभूराज देसाई म्हणाले, ते मनकवडे आहेत का ?

ओंकार कदम

Shambhuraj Desai News : शिंदे फडणवीस सरकार मधील आमदार नाराज असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी केल्यानंतर महाराष्ट्रात (maharashtra) राजकीय चर्चांना उधाण आलं‌ आहे. जयंत पाटलांच्या भविष्यवाणीवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांना छेडलं‌ असता जयंत पाटील मनकवडे आहेत का असा सवाल करीत त्यांना नव ज्ञान प्राप्त झालं आहे का असा टाेला देसाईंनी लगावला.

मंत्री देसाई म्हणाले आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलं आहे. आमचं काम चांगलं सुरु आहे. काेणीही नाराज नाही. जयंत पाटील हे मनकवडे आहेत का. त्यांना आता नवं ज्ञान निर्माण झालं आहे का. त्यांच्या पक्षात असलेल्या लोकांना आमच्याकडं येण्यापासुन थांबवुन ठेवण्यासाठी ते अशी विधान करत आहेत असेही देसाईंनी नमूद केले.

दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु

यंदाचा दसरा मेळावा माेठ्या स्वरुपात करण्याचे नियाेजन केले आहे. त्यासाठी आम्ही विविध जिल्ह्याचे दाैरे करीत आहाेत असे मंत्री देसाईंनी नमूद केले. ते म्हणाले आजपर्यंत मेळावा झाला नाही असा दसरा मेळावा यंदा हाेईल. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे नियाेजन सुरु आहे. मी व अनिल बाबर हे विविध जिल्ह्यात दाैरे करीत आहाेत. सातारा येथे देखील माेठा उत्साह असल्याचे मंत्री देसाईंनी स्पष्ट केलं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Dye Colors : टक्कल होण्याआधी डायला करा बाय बाय; घरच्याघरी सोप्या पद्धतीने केस करा काळेभोर

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

SCROLL FOR NEXT