shambhuraj desai, satara, uddhav thackeray
shambhuraj desai, satara, uddhav thackeray saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai News: 'आमचा संयमाचा अंत झाला आहे'; शंभूराज देसाईंनी काेणाला दिला इशारा (पाहा व्हिडीओ)

ओंकार कदम

Satara News: आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्हांला संयम साेडायचा नाही असा सल्ला दिला आहे. त्यामुळे आम्ही शांत आहाेत. यापुर्वी त्यांच्या गटातील खालच्या फळीतील कार्यकर्ते बाेलत हाेते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत हाेताे. परंतु आता जर काेणी वरिष्ठ नेता बाेलत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) खेड येथील वक्तव्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना दिले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून बोलताना, आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू असं म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते नाराज आणि आक्रमक झाले आहेत. जीभ हसडण्याची भाषेला जशास तसं उत्तर देऊ लागले आहेत.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले ते जसं जीभ हसडण्याची भाषा करतात त्याच्या पुढच्या गाेष्टी हसडण्याची ताकद आमच्यात आहे. परंतु आम्हांला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दिवशीच संयम साेडू नका असा सल्ला दिला आहे. परंतु आता आमच्या संयमाचा अंत झाला आहे. ज्यांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे अशांनी जीभ हासडण्याची भाषा करण्याला उत्तर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिल्याचे देसाईंनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

Today's Marathi News Live : नवी मुंबईतील भाजपचे 300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा, तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

SCROLL FOR NEXT