aaditya thackeray, Shambhuraj Desai , worli, patan , election, political news saam tv
महाराष्ट्र

Satara : मुख्यमंत्री राहू द्या, माझ्याशी लढा ! शंभूराज देसाईंची आदित्य ठाकरेंविरुद्ध दाेन हात करण्याची तयारी (पाहा व्हिडिओ)

मंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आव्हान

ओंकार कदम

Shambhuraj Desai On Aditya Thackeray : आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना आव्हान (challenge) देण्यापेक्षा त्यांनी पाटण (patan) मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं असे चॅलेंज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. ते आज (शनिवार) सातारा (satara) येथे माध्यमांशी बाेलत हाेते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आदित्य ठाकरे गेले सहा महिने काहीच बोलत नव्हते. मात्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर बोलायला लागले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतुन उभं राहण्याचं आव्हान दिल आहे.

मुख्यमंत्री यांना आव्हान देण्यापेक्षा आम्हीच आदित्य ठाकरे यांना माझ्या मतदारसंघात निमंत्रण देताे. त्यांनी पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं असे आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. (Maharashtra News)

स्वत:ला आमदार होण्यासाठी वरळीतल्या दोन आमदारांच तिकीट कापुन विधानपरिषदेची आमदारकी द्यावी लागली. एका आदित्य ठाकरेंना निवडुन आणण्यासाठी त्यांना दोन आमदारकी द्यावी लागली ही ज्यांची वस्तुस्थिती आहे त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान देणं हास्यास्पद असल्याचे देसाईंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात धक्कादायक प्रकार! 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीनच झाली गायब; आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT