udayanraje bhosale along with citizens 
महाराष्ट्र

उदयनराजेंनी शाहूपूरीवासियांना दिला शब्द

Siddharth Latkar

सातारा : सातारा पालिका ही नागरीकांची संस्था आहे. या मातृसंस्थेच्या माध्यमातुन जनतेच्या मुलभुत गरजांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. काेविड १९ च्या काळात सर्वच खर्चावर बंधने- मर्यादा येत असल्या तरी प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा मुलभुत विकास साधण्याचा प्रामणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करून घेणे, पालिकेच्या स्वनिधीतुन विकास साधणे असे विविध प्रयत्न सुरु आहेत. हद्दवाढ झालेल्या ठिकाणी आम्ही विकासाकरीता कुठेही कमी पडणार नाही हा ठाम विश्वास खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केला. shahupuri-development-bhoomipujan-udayanraje-bhosale-satara-marathi-news-sml80

सातारा पालिकेच्यावतीने शाहुपूरी भागातील विविध विकास कामांचे भुमीपूजन, लोकार्पण कार्यक्रम आज उदयनराजेंच्या उपस्थित झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमास शाहुपूरी पंचायत समिती सदस्य (तत्कालीन) संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सिध्दार्थ निकाळजे, पालिकेचे उपाध्यक्ष मनाेज शेंडे यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी तसेच शाहूपूरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले सातारा पालिका ही अ वर्ग पालिका आहे. जिल्हयातील सर्वात मोठी पालिका म्हणून सातारा पालिकेकडे पाहिले जाते. नुकतीच हद्दवाढ झाल्याने सातारा पालिकेच्या हद्दीचा विस्तार होण्याबरोबरच जबाबदारी देखील वाढली आहे. पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरीक पूर्वीपासूनच मनाने सातारा शहराशी एकरूप झालेले होते. पूर्वीही अत्यावश्यक नागरी सेवा या भागात सातारा पालिका अपवादात्मक परिस्थितीत पुरवित होती. या भागातील संपूर्ण कचरा, सातारा पालिकेच्या मालकीच्या सोनगांव कचरा डेपोवरच टाकला जात होता. आता रितसरहद्दवाढ झाल्यान या भागातील नागरीकांना सोयी-सुविधांसाठी पालिकेला विचारणा करता येणार आहे. त्यामुळे निश्चितच पालिकेची जबाबदारी वाढली आहे. यामुळेच हद्दवाढ भागाला प्राधान्य देण्यात येवून येथील रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, बंदिस्त गटर्स, आदी सुविधा पुरविणेत येत आहेत.

यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते udayanraje bhosale along with citizens श्रीराम कॉलनी ते गुरुप्रसाद कॉलनी, शाहुपूरी पोलीस स्टेशन रस्ता रुंदीकरण कामाचे भुमीपूजन, तसेच श्रीराम कॉलनी अंतर्गत बंदिस्त गटर्स बांधण्याचे भुमीपूजन, पवार कॉलनी मेन रोड रस्ता रुंदीकरण कामाचे भुमीपुजन आणि पवार कॉलनी अंतर्गत बंदिस्त गटर कामाचे भुमीपूजन, गुलमोहर कॉलनी आयटीआय रोड ते वैष्णवी देवी मंदिर रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण भुमीपूजन, पार्कीग शेडचे लोकार्पण, चिंतामणी सोसायटी येथील बंदिस्त गटर कामाचा लोकार्पण सोहळा, जयविजय कॉलनी ते देशपांडे मारुती मंदिर ते आगबेकर घर रस्ता डांबरीकरणाचा लोकार्पण व बंदिरस्त गटर कामाचे लोकार्पण, आझाद नगर चिंतामणी सोसायटी ते भंडारी घर गटर काम तसेच देशपांडे ते कुलकर्णी घरआझादनगर बंदिस्त गटर काम लोकार्पण, पेंडसेनगर आयटीआयरोड ते भापकर घर रस्ता डांबरीकरणाचा तसेच बंदिस्त गटर कामाचे लाकार्पण, मोळाचा ओढा सावंत घर ते मोळाचा ओढा चौक बंदिस्त गटर कामाचा लोकार्पण सोहळा, सर्वोदय कॉलनी काकडे वस्ती येथील काकडे घर ते नामदेव शिंदे घर रस्ता डांबरीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT