shashikant shinde vasantrao mankumre 
महाराष्ट्र

'शशिकांत शिंदेची स्टाईल संपवयाची हाेती'; 'राजे'च आमदार राहतील!

जावळी तालुक्यातील मतदान संपल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या विराेधातील गटाने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वसंतराव मानकुमरे बाेलत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील माेठ माेठ्या नेत्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून satara dcc bank election 2021 latest news माघार घेतली, मग शिंदे साहेबांचे नाक कापले असते का ? त्यांनी माघार घेतली असती तर. त्यांनी इगाे करण्याचे कारण काय, त्यांनी गुंडपुंड येथे आणण्याचे कारण काय ? तालुक्यात धिंगाणा करण्याचे कारण काय असे प्रश्न उपस्थित करीत आम्हांला शिंदे साहेबांची स्टाईल संपवयाची हाेती. ती वेळ आज आली. शिवेंद्रसिंहराजे (shivendraraje bhosale) हे शांत आमदार आहेत. त्यांना आमचे नेहमी सहकार्य लाभेल. काेणी किती काही म्हटलं तरी आता त्याचा काही उपयाेग हाेणार नाही. त्यांनी आता प्रयत्न ही करु नयेत असा इशारा जावली तालुक्यातील नेते वसंतराव मानकुमरे यांनी आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी दिला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत जावळीत दाेन गटांमध्ये शिवीगाळ, बघून घेण्याची भाषेसह वादावादी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. या तालुक्यातील मतदान संपल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या विराेधातील गटाने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वसंतराव मानकुमरे बाेलत हाेते.

मानकुमरे म्हणाले आमदार शशिकांत शिंदे यांना अनेक पदे मिळावीत ही आमची इच्छा आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून आमचा तालुक्याचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. परंतु माझाच भाऊ जिल्हा परिषदेत हवा, माझाच मूलगा पंचायत समितीत हवा अशी त्यांची भावना असते. परंतु आता सर्व लाेक सूज्ञ झालेली आहे. आमच्यावर तुम्ही निर्णय, नेतृत्व लादण्याचा प्रयत्न केला तर या तालुक्यात आम्ही हे चालू देणार नाही. आमदार शशिकांत शिंदे असाे अथवा आमदार शिवेंद्रसिंहराजे असाे त्यांच्या आधीपासून आम्ही या तालुक्यात राजकारण करीत आहाेत. आम्ही त्यावेळेला हुमगाव (शशिकांत शिंदे यांचे गाव) शिवसेनेचा आमचा उमेदवार पंचायत समितीत निवडून आणला हाेता. सातत्याने त्यांनी दादागिरी, गुंडगिरीचा आजही प्रयत्न केला. यापुढे आमच्या माणसाला केसाला धक्का लागला तर जशास तसे उत्तर देऊ. त्यांनी त्यांचा मार्ग बदलावा. सूज्ञपणे विचार करावा परंतु त्यांची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही असे मानकुमरे यांनी नमूद केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी आता जावळीत लक्ष घालणार आहे असे म्हटलं आहे या प्रश्नावर मानकुमरे म्हणाले लक्ष, लक्ष म्हणजे काय करणार आणि त्यामुळे आमची माणसं पळून जाणार आहेत का? आम्ही घाबरुन जाणार आहाेत का? ते निवडणुका लढतील. त्या आम्ही देखील लढू. खरंतर त्यांनी सुद्धा हा पराभव पचवला पाहिजे असे मानकुमरेंनी नमूद केले. ते म्हणाले आम्ही त्यांना आवाहन केले हाेते. साहेब तुमच्याकडे अपेक्षित संख्या नाही. आम्हांला रामराजे साहेब, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील आम्हांला विनंती केल्या परंतु आमची भुमिका त्यांच्यापुढे मांडली हाेती.

उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे टाेकाच्या भुमिकेला गेले परंतु ते एक झाले. आज गाेरें सारख्या कर्तबागार आमदाराने माघार घेतली. खासदार रणजितसिंह यांनी देखील सर्वांना सहकार्य केले. मग शिंदे साहेबांचे नाक कापले असते का ? माघार घेतली असती तर असा प्रश्न मानकुमरे यांनी केला. त्यांची इगाे करण्याचे कारण काय, त्यांनी गुंडपुंड येथे आणण्याचे कारण काय ? तालुक्यात धिंगाणा करण्याचे कारण काय म्हणून शिंदे साहेबांची स्टाईल आम्हांला संपवयाची हाेती. ती वेळ आज आली. शिवेंद्रसिंहराजे हे शांत आमदार आहेत. त्यांना आमचे नेहमी सहकार्य लाभले. काेणी किती काही म्हटलं तरी आता त्याचा काही उपयाेग हाेणार नाही. त्यांनी आता प्रयत्न ही करु नयेत असे मानकुमरे यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Purandar Airport: विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटला; शेतकऱ्यांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबईत मोठा राडा; CSMT स्टेशनबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रस्ता अडवला

Mumbai Crime: गार्डनमध्ये एकटीला बघून नियत फिरली, दिव्यांग महिलेसोबत पोलिसाचं भयंकर कृत्य, नागरिकांनी बघितलं अन्...

Eyebrow Growth: भुवया वाढतील रातोरात, फॉलो करा हे ५ मिनिटाचं रुटीन, तुम्हीच दिसाल आकर्षक

Maharashtra Live News Update: मुंबईत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT