Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर स्थानिक नागरिकांनी काम पाडले बंद; महामार्गाच्या कामामुळे गावे अंधारात

Shahapur News : मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गावरील ठेकेदार काम करताना कोणती ही काळजी घेत नाही. यामुळे समृद्धी महामार्गा लगत असलेल्या गावांची लाईटचे पोल तोडले गेले

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग पुर्णपणे सुरू होण्यासाठी काही महीने बाकी असताना समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र हा समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वी आंदोलनाच्या विळख्यात सापडला आहे. या महामार्गावर स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत महामार्गाचे काम बंद पाडले आहे. 

मुंबई- नागपूर या समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) ठेकेदार काम करताना कोणती ही काळजी घेत नाही. यामुळे समृद्धी महामार्गा लगत असलेल्या गावांची लाईटचे पोल तोडले गेले. चार दिवस उलटून सुध्दा लाईटच्या पोलचे काम होत नाही. म्हणून शहापूर तालुक्यातील दलखण, काष्टी या गावांमध्ये अंधार पडला आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने चार दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही. म्हणून आज या गावातील ग्रामस्थांनी समृद्धी महामार्ग आंदोलन सुरू केले असून महामार्गावर चाललेले काम बंद पाडले आहे. 

महामार्गालगत असलेल्या तीन- चार गावांमध्ये समस्या निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी आज सकाळी येथे आंदोलनाला सुरवात केली. तसेच जोपर्यंत लाईट व पाणी पुरवठा सुरळीत होत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

Today Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT