Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Khardi Forest Aria : खर्डी राखीव जंगलात शिकारीसाठी आलेला एकजण ताब्यात; रात्रीच्या सुमारास वन विभागाची कारवाई

Shahapur News : वन क्षेत्र असल्याने या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास पाहण्यास मिळतो. यामुळे या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी येत असतात. यासाठी वन विभागाकडून गस्त घालण्यात येत असते.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर तालुक्यातील खर्डी राखीव वन परिक्षेतील दापोरच्या जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने दोन जण आले होते. मात्र वनक्षेत्र परिसरात रात्री गस्त घालत असलेल्या वन विभागाच्या पथकाला ते निदर्शनास आले. यानंतर या पथकाने शिकारीसाठी आलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. 

शहापूर तालुक्यातील खर्डी वन परिक्षेत्रातील अजनुप दापोरच्या जंगलात शिकारीसाठी आलेल्या सादू भागडे (वय ४८) याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तर याचा जोडीदार मधू हा फरार झाला आहे. वन क्षेत्र असल्याने या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचा अधिवास पाहण्यास मिळतो. यामुळे या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी रात्री- अपरात्री येत असतात. यासाठी वन विभागाकडून गस्त घालण्यात येत असते.

दरम्यान रात्री खर्डी वन परिक्षेत्रातील वन कर्मचारी रात्री एक वाजता दापोरच्या जंगलात गस्त घालत होते. यावेळी शिकारीसाठी आलेल्या एक जणांला बंदूक व ठूसीच्या गोळ्या असे वस्तू आढळून आले आहे. त्याला ताब्यात घेत शिकारीसाठी वापरले जाणारे सर्व साहित्य वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहे. दरम्यान सादु याचा जोडीदार मधू हा फरार झाला आहे. 

या प्रकरणी वन कलम १९७२ अंतर्गत दाखल करण्यात आले असून दुसऱ्या अरोपीचा शोधात वनपाल अंकूश तारमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भास्कर डोनरपली, नितेश राठोड, संदीप निकम, रंगनाथ जायभाये, कविता पाटील, रेणुका गायकवाड हे तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT