Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : परराज्यातून अल्पवयीन मुलांना आणत जुंपले कामाला; सिगल कंपनी मॅनेजरवर गुन्हा दाखल

Shahapur News : मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा बायपास येथे एका अंडरपास पुलाचे काम सुरू आहे. तसेच पुलावर सिमेंट काँक्रीटच्या भेगांमध्ये गरम डांबर भरण्याचे काम सुरू यासाठी मजुरांची आवश्यकता

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: लहान मुलांना कामाला लावणे कायद्याने मनाई आहे. अशा पद्धतीने मजुरीसाठी कामाला लावणे गुन्हा असताना देखील परराज्यातून अल्पवयीन मुलांना आणून त्यांना मुंबई- नाशिक महामार्गावर कामासाठी मजूर म्हणून लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिगल कंपनीच्या मॅनेजर व मॅनेजमेंटवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

महामार्ग किंवा रस्त्याचे काम करण्यासाठी बाहेरून मजूर आणले जात असतात. यासाठी परराज्यातील परिवार स्थायिक होत असतात. त्यानुसार मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा बायपास येथे एका अंडरपास पुलाचे काम सुरू आहे. तसेच पुलावर सिमेंट काँक्रीटच्या भेगांमध्ये गरम डांबर भरण्याचे काम सुरू असून यासाठी मजुरांची आवश्यकता असल्याने सदर कामासाठी बाहेरून मजूर आणले जात आहेत. 

लहान मुलांचा जुंपले मजुरीच्या कामाला 

बोगद्याचे काम सुरु असताना यासाठी काही मजूर काम करत आहेत. तर भर उन्हात गरम डांबर भरण्यासाठी कामगार म्हणून १४ व १५ वर्षाचे लहान परराज्यातील मुलांचा मजूर म्हणून सर्रास वापर केला जात आहे. ही बाब कसारा येथील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती देत घटनास्थळी बोलावले. 

कंपनी मॅनेजमेंटवर गुन्हा दाखल 

यानंतर पोलिस सदर कामाच्या ठिकाणी येऊन चौकशी केली. तसेच काम करणाऱ्या या कामगारांचे आधार कार्ड तपासले असता यांचे वय हे कोणाचे १४ वर्षे तर कोणाचे १५ वर्षे आढळून आले. यामुळे कसारा पोलीस ठाण्यात सिगल कंपनीचे मेनेजर व कंपनी मॅनेजमेंट यांच्या विरोधात बालमजूर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास कसारा पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT