Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : हत्या करून मृतदेह फेकला कसारा घाटातील दरीत; पोलिसांकडून तपास सुरु

Shahapur News : काम करत असलेल्या कामगारांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. कामगारांनी याची माहिती पोलिसांना दिली

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर : मुंबई- नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र (Shahapur) सदर व्यक्तीची हत्या करून नवीन कसारा घाटतील (Kasara Ghat) ब्रेक फेल पॅइटच्या खाली खोल दरीत फेकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Live Marathi News)

मुंबई- नाशिक महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू असताना याठिकाणी दुर्गंधी पसरली होती. येथे काम करत असलेल्या कामगारांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. कामगारांनी याची माहिती पोलिसांना दिली. (Crime News) यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सदर व्यक्तीचे आंदाजे वय २५ ते ३० वर्षे असल्याचे व्यक्त केले जात आहे. मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह शवाघ्रात पाठविण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीन- चार दिवसापूर्वीची घटना 
दरम्यान पोलिसांना तपासाला सुरुवात केली असून हा मृतदेह एका कपड्यात गुंडाळून तीन ते चार दिवस अगोदर या ठिकाणी फेकले होते. याबाबत कसारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कसारा पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT