Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : स्मशानभूमीच्या जागेवरून विकासक व गावकऱ्यात वाद; जागेवर प्लॉट पडल्याने अडचण

Shahapur : शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या करंजपाडा गावात स्मशानभूमी स्थानिक मुळ शेतकऱ्याच्या सहमतीने २००६ मध्ये शासकीय निधीचा वापर करून बांधण्यात आली होती.

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

शहापूर : गावासाठी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीवरून ग्रामस्थ व विकासक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. हा प्रकार शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या करंजपाडा गावात उद्भवला आहे. दरम्यान विकासकाने अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. 

शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या करंजपाडा गावात स्मशानभूमी स्थानिक मुळ शेतकऱ्याच्या सहमतीने २००६ मध्ये शासकीय निधीचा वापर करून बांधण्यात आली होती. मात्र सन २०१० ला शेतकऱ्याने ही शेत जमिन विकासकाला विक्री केली. या नंतर सदर विकासकाने या जागेत असलेली स्मशानभूमी तोडल्याने गावकरी व विकासाकमध्ये वाद निर्माण झाला आहे. 

यानंतर हा विषय कसारा पोलिस ठाण्यात पोहोचला होता. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने सदर जागेचा वाद मिटविण्यात आला होता. असे असले तरी देखील गावकऱ्यांनी ज्या जागेवर स्मशानभूमी आहे; त्याच ठिकाणी पुन्हा स्मशानभूमी बांधून द्यावी. अशी मागणी केली. मात्र विकासकाने सदरची जागा ऐने केल्याने स्मशानभूमी बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. जागा ऐने केल्याने येथे स्मशानभूमी बांधता येणे शक्य नाही. 

सद्या गावकरी तोडलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यसंस्कार करत आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास विकासकाने मनाई करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामुळे गावकरी व विकासाकमध्ये वाद निर्माण झाले आहे. हा वाद मिटविण्यासाठी तंज्ञ अधिकारी यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवाव असी अपेक्षा गावकरी करत आहेत. परंतु गावकऱ्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा सध्या उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT