Shahapur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Accident : टेम्पोच्या धडकेत दूध विक्रेत्याचा मृत्यू; शहापूर तालुक्यातील घटना

Shahapur News : महामार्गावरील भातसा फाट्याजवळ आले असताना त्यांना भरधाव वेगाने म्हशीचे पारडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: सकाळी नेहमीप्रमाणे दूध वाटप करण्यासाठी गेलेल्या दूध विक्रेत्याला टेम्पोने जोरदार धडक दिली. यात दुध विक्रीतेच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील भातसा फाट्याजवळ मुंबई- नाशिक महामार्गावर आज सकाळच्या सुमारास घडली. 

मुंबई नाशिक महामार्गावरून दुध विक्रेता पोपट बिन्नर (वय ५२) यांचा (Accident) अपघातात मृत्यू झाला आहे. पोपट बिन्नर हे रोज मोटरसायकलने दूध विक्रीसाठी जात असत. नेहमीप्रमाणे ते आज देखील सकाळ दुध घेऊन (Shahapur) शहापूरच्या दिशेने विक्री करण्यासाठी निघाले होते. दरम्यान महामार्गावरील भातसा फाट्याजवळ आले असताना त्यांना भरधाव वेगाने म्हशीचे पारडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे दूध विक्रेता खाली कोसळले. यानंतर ते टेम्पोच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी टेम्पो केला जप्त 
अपघातग्रस्त आयशर टेम्पो हा सिन्नरहून म्हशीचे पारडे भरून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी हा अपघात घडला. अपघात घडल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आयशर टेम्पो खर्डी पोलिस ठाण्यात जमा केला असून पुढील तपास करीत आहेत. तसेच अपघातानंतर महामार्गावर ट्राफिक जाम झाली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT