Jharkhand Crime News Saam TV
महाराष्ट्र

Jharkhand Crime News:धाकट्या बहिणीसमोर पीडिता बेशुद्ध होईपर्यंत बलात्कार; धक्कादायक घटनेनं झारखंड हादरलं

पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांचे एक पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Jharkhand Crime News: झारखंडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लहान बहीण बरोबर असताना तिच्या समोर मोठ्या बहिणीवर दोघांनी बलात्कार केला आहे. पीडिता बेशुद्ध झाल्यावर नराधमांनी तिला सलैया जंगलात सोडून पळ काढला. २९ नोव्हेंबर रोजी गढवा जिल्ह्यातील रांका पोलीस स्टेशन हद्दीत सदर घटना घडली आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांचे एक पथक आरोपींचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

पीडित मुलींनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी त्या दोघी बहिणी बोडी गावात त्यांच्या आणखीन एका मोठ्या बहिणीकडे (Sister) जात होत्या. चार हुमाणीजवळ त्या पोहचल्या असता मागून एक वॅन आली. या गाडीत चालकासह आणखीन एक व्यक्ती बसला होता. पीडित मुलीने बोडी येथे जायचे आहे सांगून लिफ्ट मागितली. त्यावेळी वाहन चालक आणि दुसऱ्या व्यक्तीने आम्हालाही तिथेच जायचे आहे असे सांगत मुलींना लिफ्ट दिली.

मात्र त्या दोघांची नियत फिरली आणि त्यांनी गाडी थेट सलैया जंगलात थांबवली. त्यांनी दोन्ही बहिणींना बेदम मारहाण केली. त्यानंतर मोठ्या बहिणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी लहान बहीण तिथेच होती. आपल्या बहिणीला वाचवण्याचा तिने खुप प्रयत्न केला. मात्र त्या नराधमांनी तिला देखील मारहाण केली. अशात पीडिता बेशुद्ध होईपर्यंत ते लैंगिक अत्याचार करत राहिले आणि नंतर तिथून पळ काढला.

लहान बहिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोठी बहीण बेशुद्ध झाल्यावर तिने कसेबसे तिला शुद्धीवर आणत बोडी येथील बहिणीचे घर गाठले. तिथे पोहचल्यावर दोघींनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी दोघींसह पोलीस स्टेशन गाठले. अशात पीडित मुलींनी आरोपींविषयी दिलेल्या वर्णनावरून पोलीस (Police) त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वर्धा भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपकडून पत्रकार परिषद आयोजित

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

Jio Recharge : Jio चा धमाकेदार प्लान! एकाच SIM वर संपूर्ण फॅमिलीला अनलिमिडेट कॉलिंग अन् डेटासह अनेक फायदे

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

SCROLL FOR NEXT