Bhandara Crime Saam TV
महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 18 वर्षीय तरुणाला अटक

लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन बालिकेवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन बालिकेवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यात (Bhandara Crime) लाखांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चप्राड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अत्याचारांमुळे बालिका गर्भवती झाल्यावर 18 वर्षीय युवकाने लग्न करण्यास नकार दिला आहे. पीडित अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी 18 वर्षीय युवकाविरोधात बलात्कार आणि पॉस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 27 मार्च रोजी लाखांदूर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश दिवाकर हजारे (वय- 18) असं घटनेतील आरोपी (Accused) युवकाचे नाव आहे.

हे देखील पहा-

नेमकं काय आहे प्रकरण?

आरोपी युवकाने काही महिन्याअगोदर गावातीलच एका अल्पवयीन बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. तिला लग्नाचे आमिष दाखवत 5 महिन्यांपासून तो नियमित बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पवयीन बालिकेला गर्भधारणा झाली. त्यामुळे पीडित बालिकेने आरोपीला लग्नासाठी गळ घातली.

यावेळी आरोपीने गर्भवती अल्पवयीन बालिकेशी लग्न करण्यास नकार दिला. बालिकेने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. अल्पवयीन बालिका गर्भवती झाल्याचे माहित होताच कुटुंबियांनी बालिकेसह लाखांदूर पोलिसात धाव घेत आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी आरोपी युवकाविरोधात बलात्कार आणि पॉस्कोसह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लाखांदुर पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT