सेलू पोलीस ठाणे सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

वर्धा: मजुरीच्या मोबदल्यात पतीच्या मित्राकडून विवाहितेचं लैंगिक शोषण!

सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

सुरेंद्र रामटेके

वर्धा : पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यास गेलेल्या विवाहितेच्या पतीच्या मित्रानेच शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सेलू पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबद्दल सेलू पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सेलू पोलिसांनी दिली.

आरोपीने केली शरीर सुखाची मागणी;

पीडित महिला पतीच्या मजुरीचा मोबदला मागण्यासाठी पतीचा मित्रा रिंकूकडे गेली असता आरोपी रिंकूने पीडितेला शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिने नकार देऊन दुसरीकडे पैसे मागण्यास गेली. तेथीही तिला पैसे न मिळाल्याने ती परत आरोपी रिंकूकडे आली. तेव्हा त्याने ता. 15 फेब्रुवारी 2022 रोजी पीडितेचे लैंगिक शोषण करुन तिला पैसे दिले.

हे देखील पहा-

तर, आरोपी रिंकू शेख हा वारंवार पीडितेला धमकावून शरीर सुखाची मागणी करू लागला. तसेच घडलेला प्रकार तुझ्या पतीला सांगण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. अखेर पीडितेने ही बाब पोलिसांपुढे कथन केल्यानंतर सेलू पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT