Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

संतापजनक! बीडमध्ये सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची भररस्त्यात छेडछाड

आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक...

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये (Beed) पुन्हा एकदा महिला अन् मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थीनीला, भररस्त्यात अडवून छेडछाड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

बीड शहरातील सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी, नेहमी प्रमाणे शिकवणीसाठी गेली होती. यावेळी सायकलवरून घरी परतत असतांना, आरोपी वैभव चंद्रसेन क्षीरसागर 19 , रा . संत नामदेवनगर, बीड याने, दुचाकीवरून येत तिला अडवले. आणि त्याने भररस्त्यात हात पकडत छेड काढण्याचा प्रयत्न केला. (Beed Crime News)

दरम्यान पीडितेने घरी गेल्यावर हा सर्व प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात याविषयी तक्रार दिली असून आरोपी वैभव क्षीरसागर विरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात, विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आला आहे. तर या घटनेमुळं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यत महिला अन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT