Police Recruitment 2024 Saam TV
महाराष्ट्र

Police Bharti 2024: तरुणांनो तयारीला लागा! राज्यात पुन्हा ७ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार

Maharashtra Police Recruitment 2024: सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ जागांसाठी भरती सुरू आहे. ही भरती १ सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

मुंबई, ता. १६ जुलै २०२४

भरतीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. राज्यात पुन्हा एकदा अंदाजे सात हजार जागांसाठी पोलीस भरती होईल, अशी माहिती गृहविभागातील सुत्रांनी दिली आहे. राज्यात सध्या २०२३मधील रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळातील भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात दोन वेळा पोलीस भरती झाली आहे. सध्या २०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ जागांसाठी भरती सुरू आहे. ही भरती १ सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २५ जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांतील चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅड्समॅनची लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे.

शहरांचा वाढता विस्तार, लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, तसेच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस प्रशासनावर ताण आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या ज्या शहरात, जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची गरज आहे. रिकामे पदे आहेत, त्यांनी गृह विभागाकडे प्रस्ताव द्यावेत, त्यांचे मनुष्यबळ वाढवून मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलिस भरतीला सुरवात होवू शकते, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT