Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, सात जणांचा मृत्यु

या अपघातात एक मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - नागपूर (Nagpur) उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव टवेरा गाडी ट्रकवर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात एक मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हे देखील पाहा -

रात्री १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरागाडी ट्रक वर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली आहे. सागर शेंडे, मेघा आशिष, देविदास गेडाम, नरेश डोंगरे अशी मृतांची नावे असून उर्वरितांची नावे अद्याप कळू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच हुडके‌श्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान या घटनेनंतर उमरेड मार्गावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. उमरेड पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतक व जखमीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT