विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना Saam Tv
महाराष्ट्र

विजेचा धक्का लागून सात गायींचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना

रोहित्रावरील विद्युत तार तुटून विजेचा धक्का लागल्याने सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : रोहित्रावरील विद्युत तार तुटून विजेचा धक्का लागल्याने सात गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. गेवराई ब्रूक बाँड येथे ही घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पहा-

मोकळ्या जागेत महावितरणचे रोहित्र गेवराई येथील पगारिया ऑइल मिल आहे. या रोहित्रा वरील विद्युत तार सायंकाळी तुटली होती. याच दरम्यान शेतातून येणारी गाईची झुंड या परिसरात येत होत्या त्यावेळेस विजेचा धक्का लागल्याने एका पाठोपाठ एक अशा सात गाई मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विद्युत् पुरवठा बंद केला. यानंतर मूर्त काहींना बाजूला काढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

या घटनेत कृष्णा पवार, प्रकाश राठोड, संजय राठोड, संतोष माळवदे, दिलीप मुळे, अमोल केदार आदी सहा शेतकऱ्यांच्या सात गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी काळे यांनी गाईंचा पंचनामा केला. अहवालानंतरच घटनेस कारणीभूत कोण आहे याची माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT