Political News Saam Tv
महाराष्ट्र

नवाब मालिकांनी मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून आणले; श्वेता महालेंचा गंभीर आरोप

हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे .

संजय जाधव

बुलडाणा - ज्या नवाब मालिकांनी मुंबईत (Mumbai) बॉम्ब स्फोट घडवून आणले आहेत तसेच शिवसेना भवनात बॉम्ब स्फोट घडवून आणले अश्या नवाब मालिकांना (Nawab malik) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी केलं आहे.

ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस सोबत सत्तेत बसले त्याच दिवशी यांनी हिंदुत्वाला लाथ मारली आहे. त्यांचं हिंदुत्व म्हणजे ढोंगीपणाच आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे .त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. खर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत निघून गेले आहे असे देखील श्वेता महाले यावेळी म्हणाल्या.

हे देखील पहा -

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र त्यासाठी नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT