MLA Ravi Rana saam tv
महाराष्ट्र

राऊतांमुळे आमच्यावरही अत्याचार झाला; आमदार रवी राणा काय म्हणाले? वाचा...

आमदरा रवी राणांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: आधी जवळपास 10 तास झाडाझडती, त्यानंतर ईडी कार्यालयात नेऊन चौकशी आणि त्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनीही संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकचं नाही तर त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. (MLA Ravi Rana News)

काय म्हणाले रवी राणा?

गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करते आहे. अनेकदा संजय राऊत यांना देखील बयान नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी अनेक भ्रष्टाचार केलेत. त्याचे धागेदोरे सुद्धा मोठे आहेत आणि ते अनिल परब पर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. राऊतांमुळे आमच्यावर देखील अत्याचार झाला. जैसी करणी वैसी भरणी असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राणा म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. उद्धव ठाकरेंना भाजपकडून बाहेर काढून काँग्रेसमध्ये युती झाली आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं यामागे सुद्धा संजय राऊत होते. अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. (Sanjay Raut Latest News)

राऊतांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्याप्रकरणी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली शिंदे म्हणाले, 'तो ८ वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. शिवाय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील असं देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT