विदर्भ वेगळा झालाच पाहिजे; विदर्भवाद्यांचे आंदोलन जयेश गावंडे
महाराष्ट्र

विदर्भ वेगळा झालाच पाहिजे; विदर्भवाद्यांचे आंदोलन

वेगळ्या विदर्भासाठी आज अकोल्यातील मूर्तिजापूर येथील बसस्थानक चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले.

जयेश गावंडे

अकोला : वेगळ्या विदर्भासाठी आज अकोल्यातील मूर्तिजापूर येथील बसस्थानक चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी मागणी या विदर्भवाद्यांनी केली.

हे देखील पहा -

नागपूर येथे 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून ते 15 ऑगस्टपर्यंत चंडिका माता मंदिर, शहिद चौक नागपूर येथे विदर्भ आंदोलन समितीतर्फे सात दिवसांचे डेरा आंदोलन उभारण्यात आले होते. हे आंदोलन सुरळीत पार पडले. त्याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून २६ ऑगस्टला स्वतंत्र विदर्भ, न्याय व हक्कासाठी, विदर्भातील सर्व तालुक्यांत रास्तारोको व ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनातील मागण्या :

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करण्यात यावी

विदर्भातील कोरोना काळातील वीजबिल सरसकट माफ करण्यात यावे

विदर्भातील शेतकरी बांधवांना कृषिपंपाचे वीजबिल नियमितपणे मोफत देण्यात यावे

विदर्भातील नागरिकांना नियमितपणे 200 युनिट पर्यंत वीज पुरवठा मोफत पुरविण्यात यावा

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

भंडारा, महाप्रसादासाठी FDAची परवानगी बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास गुन्हा होईल दाखल

रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात निष्पापांचे मारेकरी कोण?

Mumbai Local Viral Video :बोंबिल मासा खाताय? वेळीच सावध व्हा! माश्याला लाल कलर लावतानाचा व्हिडिओ होतोय VIRAL

SCROLL FOR NEXT