शाळेचे शिपाई कांदा लागवडीसाठी संस्थाचालकाच्या शेतात कैलास चौधरी
महाराष्ट्र

शाळेचे शिपाई कांदा लागवडीसाठी संस्थाचालकाच्या शेतात !

संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक आणि खाजगी कामासाठी होणारा वापर काही नवीन नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक आणि खाजगी कामासाठी होणारा वापर काही नवीन नाही. उस्मानाबादमध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला असून संस्थाचालकाने शाळेतील शिपायांमार्फत शेतात कामे करून घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हे देखील पहा -

या व्हिडिओत उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री येथील वसंतराव नाईक यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या शाळेतील शिपाई पदावरील कर्मचारी संस्थाचालकांच्या शेतात कांदा लागवड करत असल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या संचालकाविरुद्ध या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. घाटंग्री येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्याधन प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. हि शाळा भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून वसतिगृह देखील येथे आहे.

या शाळेचे गुलाब जाधव हे संस्था चालक आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असली तरी कर्मचारी आणि शिक्षक यांना दररोज शाळेत यावे लागत असून या प्रकरणी गावातील अरविंद राठोड यांनी हा व्हिडिओ काढत जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली असून संस्था चालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT