Nagpur School : नागपूरमधील शाळा आजपासून गजबजणार
Nagpur School : नागपूरमधील शाळा आजपासून गजबजणार SaamT
महाराष्ट्र

Nagpur School : नागपूरमधील शाळा आजपासून गजबजणार

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : कोरोना (Corona) महामारीमुळे मार्च 2020 पासून बंद असणाऱ्या शाळा आता हळूहळू सुरु होत आहेत. कालच मुंबई मधील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तर आजपासून नागपूरमधील शाळांमध्येही लहानग्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे.

हे देखील पहा -

नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) हद्दीतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत. नागपूरात सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असं असलं तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून शाळा सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी काल काढले आहेत.

विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेणं अनिवार्य आहे. तसंच शाळेच्या परिसरात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी होणार नाही याची काळजी शाळा प्रशासनानं घेण्याचे निर्देश देण्यात आलेय. दीड- पावणेदोन वर्षांनंतर हे वर्ग सुरू होणार असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह आहे. शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जाणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mamata Banerjee: लोकसभा निवडणुकीत भाजप 195 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, ममता बॅनर्जी यांचा दावा

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर उद्या सुनावणी; ऐन निवडणुकीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Babar Azam Record: बाबर आझमने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनीलाही सोडलं मागे

SCROLL FOR NEXT