Sangli School Girl Death News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli Breaking News: कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सांगली शहरात खळबळ

Sangli Latest News: कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक सांगली शहरातील कुपवाड परिसरात घडली.

Satish Daud

Sangli School Girl Death News

कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक सांगली शहरातील कुपवाड परिसरात घडली. साक्षी रवींद्र जाधव (राहणार मिरज) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत साक्षी कुपवाड हद्दीतील (Sangli News) झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली. साक्षीने आपली स्कूलबॅग शाळेच्या बसमध्ये ठेवली.

त्याच वेळी तिचे पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली. दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे ४० ते ४५ फूटाच्या अंतरावरून तिने उडी घेतली. या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. दरम्यान, साक्षीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT