Sangli Accident Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Accident: स्कूल बस पलटी होऊन ७-८ विद्यार्थी जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

चालकाचे स्कूल बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली.

विजय पाटील

सांगली - मिरज कुरणे मळा सिध्येवाडी येथे स्कूल बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. भोसे गावातील अंदाजे 25 ते 30 विद्यार्थी या स्कूल बस मध्ये होते. चालकाचे स्कूल बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली. या अपघात 7 ते 8 विद्यार्थी जखमी झालेले आहेत असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.

हे देखील पाहा -

या अपघातात मयूर गुरव, संभव चावला, श्रद्धा पाटील, हर्षद पाटील यांच्यासह अन्य विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून चालक गायब झाला आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता असे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले. शाळा प्रशासनाने या पुढे आशा दुर्घटना घडू नयेत आणि जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT