Satyajit Tambe took the oath of MLC saam tv
महाराष्ट्र

Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंनी अशोक चव्हाणांच्या पाया पडून घेतले आशिर्वाद, चव्हाणांनी...

Satyajeet Tambe News: 'पहिले दादा अजित दादा, दुसरे दादा सत्यजित दादा' अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Satyajeet Tambe : आज विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आमदाराकीची शपथ घेतली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची उपस्थिती होती.

सत्यजित तांबे यांनी यावेळी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. अशोक चव्हाण यांनी देखील त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

यावेळी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रम काळे आणि सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'पहिले दादा अजित दादा, दुसरे दादा सत्यजित दादा' अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, या कार्यक्रमाला थोरात साहेब आणि माझे वडिल यांना उपस्थित राहता आले नाही. आता मी जनतेच्या कामांना सुरुवात करणार आहे. काँग्रेसविषयी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या भावना काँग्रेस श्रेष्ठींना कळवल्या आहेत. मी अपक्ष निवडणून आलो आहे आणि आता जनतेच्या कामाला सुरुवात करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT