Satish bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale: खोक्या तुरुंगात, कुटूंबाचं जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण, बायको म्हणाली...

Satish Bhosale Wife Protest: ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या पोलिस कोठडीत आहे. खोक्याने पोलिस कोठडीत उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे न्याय मिळावा यासाठी त्याची पत्नी कुटुंबीयांसोबत उपोषणाला बसली आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या तुरुंगात आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसलेने वन विभागावर आरोप करत सांगितले की, 'वनविभागाने आम्हाला रस्त्यावरती आणलं. संसार उपयोगी साहित्य नाही तर आमची लेकरं रस्त्यावरती आली. राहायला घर नाही.' बावी येथील ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झालाय. मात्र त्यांना अटक का होत नाही?, असा सवाल सतीशच्या बायकोने केला आहे. ढाकणे पिता-पुत्रांना अटक करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

शिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. त्याने पोलिस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी, बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणांमध्ये सहभाग घेतला आहे.

'आमचं अज्ञात लोकांकडून घर जाळण्यात आलं. त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर बावी येथील ढाकणे पिता पुत्रांनी आम्हाला चुकीची वागणूक देऊन आम्हाला मारहाण केली. त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे मात्र त्यांना तात्काळ अटक करावी, त्याचबरोबर वनविभागाने अति घाई करून आमचं घर पाडलं. आम्हाला रस्त्यावरती आणलं. आमची लेकरं रस्त्यावरती आली. आम्हाला न्याय मिळावा.' अशी मागणी उपोषणाला बसलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या बायकोने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT