विमान संग्रहित छायाचित्र Saam TV
महाराष्ट्र

कोल्हापूर विमानताळवरुन मालवाहतुक सुरू होणार; पालकमंत्री आग्रही

Siddharth Latkar

कोल्हापूर : काेल्हापूर येथून प्रवासी विमानसेवेतून मालवाहतूकची सुवधिा उपलब्ध cargo service झाल्यास त्याचा फायदा काेल्हापूरसह सातारा, सांगलीसह काेकणातील नागरिकांना हाेईल. त्यादृष्टीने विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी काेल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील satej patil यांनी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे Jyotiraditya Scindia यांच्याकडे केली होती. त्यास ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काेल्हापूर विमानतळाच्या टर्मिनस इमारतीचे बांधकाम मंद गतीने सुरू आहे. त्या कामाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी मागणी करुन येथील विमानतळावरून सध्या केवळ प्रवासी विमानसेवा सुरू आहे. या प्रवासी विमानसेवेमुळे नागरिक हैदराबाद, मुंबई, बंगळूर, अहमदाबाद, तिरुपती येथे ये-जा करु लागले आहे. आता या विमानसेवेतून मालवाहतूक झाल्यास त्याचा उद्याेजकांना फायदा हाेईल असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान मंत्री पाटील यांनी नुकतीच विमानतळ प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांशी देखील याबाबत चर्चा केली आहे. आगामी काळात मालवाहतुक (कार्गो) सेवेसाठी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर येथून शिर्डी, नागपूर, गोवा-पुणे मार्गे कोल्हापूर, जोधपूर, जयपूर, दिल्ली आणि म्हैसूर या मार्गावर विमानसेवा सुरू करावी असेही मंत्री पाटील यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यासह नाईट लँडिंग सुविधा night landing facility , नाईट पार्किंग night parking, हँगर , एअरबस एबी ३२० प्रकाराच्या विमानाचे दळणवळण आदींची मागणीही करण्यात आली आहे. satej-patil-demands-cargo-service-from-kolhapur-airport-to-jyotiraditya-scindia-sml80

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT