Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News saam tv
महाराष्ट्र

Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक गटास माेठा धक्का, 'राजाराम' चे 1272 सभासद अपात्र; सतेज पाटील कारखाना ताब्यात घेणार?

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : प्रादेशिक सहसंचालक यांनी कोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र ठरवले आहेत. यामुळे सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांच्या गटाला हा माेठा धक्का मानला जात आहे. (Breaking Marathi News)

प्रादेशिक सहसंचालक यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत 1272 सभासदांना अपात्र ठरवलेल्यांमध्ये शौमिका महाडिक (shoumika mahadik) यांचा समावेश आहे. त्याशिवाय महाडिक परिवारातील एकूण 10 जण अपात्र झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील (mla satej patil latest marathi news) यांनी आज (गुरुवार) काेल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.

सतेज पाटील म्हणाले 1346 सभासदांचे अपात्रेतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने स्थगित करून सर्व अपात्र सभासदांची फेर सुनावणी घ्यावी म्हणून प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे परत पाठवला होता. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी त्यावर हा मोठा निर्णय दिला आहे.

अपात्र सभासदांच्या कृपेने ते निवडणूक जिंकले

शेवटी सत्याचा विजय झाला आहे असे म्हणत सतेज पाटलांनी कारखाना खऱ्या सभासदांच्या मालकीचा पाहिजे अशी अपेक्षा होती ते आता झाले आहे. आमचे पॅनेल 300 तर 400 ने निवडून आले असते मात्र या अपात्र सभासदांच्या कृपेने ते निवडणूक जिंकले असा टाेलाही पाटील यांनी महाडिक गटास मारला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणा संदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT