MLA Mahesh Shinde Agitation Along With Warkari 
महाराष्ट्र

सेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल

ओंकार कदम

सातारा : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर bandatatya karadkar यांची स्थानबद्धतेून सुटका करा या मागणीसाठी आज (शुक्रवार) काेरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे mahesh shinde यांनी वारक-यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली आहेत. (satara-warkari-agitation-released-bandatatya-karadkar-mla-mahesh-shinde)

बंडातात्या क-हाडकर यांना पाेलिसांनी क-हाडला गाेपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. त्यांच्या सुटकेसाठी उठाव हाेऊ लागला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे (गुरुजी) यांनी नुकताच क-हाडला माेर्चा काढला हाेता. त्यानंतर साता-यात व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव विलासबाबा जवळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. आज (शुक्रवार) आमदार महेश शिंदे यांनी टाळ वाजवित जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने सुरु केली आहेत.

यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर यांनी वारी संदर्भात काही निर्णय घेतले हाेते. काेराेनाच्या महामारीमुळे प्रशासनाने हे निर्णय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. ख-या अर्थाने आज राज्यात आंदाेलन, निवडणुका माेठ्या प्रमाणात हाेतात. असे असताना सुद्धा फक्त वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांना तरी वारीला जाण्यासाठी परवानगी द्यावी.

पांडूरंग आमचा श्रद्धेचेस्थान आहे. वारक-यांसाठी आषाढी वारी ही सर्वश्रेष्ठ असते. काेणत्याही परिस्थितीत बंडातात्यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी. बंडातात्यांना काही वारक-यांसमवेत प्रशासनाने वारीला जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाच्या आलिशान कारची दुचाकीला धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Itchy ears after bathing: आंघोळीनंतर तुमच्याही कानात सतत खाज येते? दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Home Cleaning Tips: दिवाळीसाठी घराची साफसफाई करायची आहे? मग, वेळ आणि मेहनत वाचवणाऱ्या ७ सोप्या टिप्स नकी फॉलो करा

SCROLL FOR NEXT