satara , Satara Crime News , Satara Police  saam tv
महाराष्ट्र

Satara : भरवस्तीत सुरु हाेता जुगार; पाेलिसांच्या छाप्यात सहा जणांसह दीड लाखांचा मुद्देमाल ताब्यात

संबंधित सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

सातारा : शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने (satara) शहरातील (city) मध्यवस्तीत सुरु असलेल्या एका तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात पाेलिसांनी (police) सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल दीड लाख रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Satara Crime News)

पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना खब-याकडून सातारा शहरातील बुधवार नाका येथील सर्व्हिसिंग सेंटरचे पाठीमागे अवैध तीनपानी मटका जुगार चालु असलेची माहिती मिळाली हाेती. त्यानूसार पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाईच्या सुचना केल्या.

या पथकाने बुधवार नाका येथील एका सर्व्हिंसींग सेंटरचे पाठीमागे अचानकपणे छापा टाकला. तेथे बेकायदेशिररित्या तीनपानी मटका जुगार चालु असल्याचे पथकास दिसले. त्यानंतर घटनास्थऴावरुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अवैध जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बो-हाडे (अतिरिक्त पोलीस अधीक्षक), सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत या पाेलिस दलातील कर्मचा-यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Maharashtra News Live Update: जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्यासाठी सक्ती कराल तर खंडणी समजली जाईल, पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

यंदा पावसाळ्यात लांब कुठेच नको! मुंबईपासून जवळ असलेल्या 'या' 5 सुंदर ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात येईल भारी मज्जा

SCROLL FOR NEXT