satara, pune, katraj tunnel, old katraj tunnel, national highway
satara, pune, katraj tunnel, old katraj tunnel, national highway saam tv
महाराष्ट्र

Satara Pune Highway : साता-याहून पुण्याला जाणा-या वाहतूकीच्या मार्गात ३१ डिसेंबरपर्यंत माेठा बदल; जाणून घ्या कारण

Siddharth Latkar

Satara Pune Highway : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग (जुना कात्रज घाट) रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (rajesh deshmukh) यांनी जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून (ता. तीन डिसेंबर) करण्याचा आदेश पारित केला आहे.

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानूसार आजपासून (ता. तीन) ३१ डिसेंबरपर्यंत सातारा (satara) ते पुणे (pune) जुना कात्रज घाट (katraj tunnel) रस्त्यावरील वाहतूक बंद (Traffic in old Katraj ghat road diverted from Dec 3) करुन वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आजपासून ३१ डिसेंबर पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे (pune) वळविण्यात येणार आहे. पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT