Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale saam tv
महाराष्ट्र

Uncut Udayanraje Bhosale : आम्हांला आया बहिणींवरुन काेणी शिव्या दिल्या नाहीत..., असे लाेक एवढ्या माेठ्या घराण्यात जन्माला आले कसे ? : उदयनराजे (पाहा व्हिडिओ)

Udayanraje Criticizes Shivendraraje Bhosale: आगामी पालिका निवडणुकीपुर्वीच साता-यात दाेन्ही राजेंचे एकमेकांवर आराेप प्रत्याराेप करु लागले आहेत.

Siddharth Latkar

Satara News: सातारा शहर आणि परिसरात गुरुवारी खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. त्यावेळी राजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसलेंच्या आराेपांना उत्तर देताना काेणाच्या काळात कसा भ्रष्टाचार झाला याचा दाखल दिला. दुर्देवाने सांगावेसे वाटते असे लाेक एवढ्या माेठ्या घराण्यात जन्माला आले कसे असे नमूद करीत लाेकांचे पैसे यांनी खाल्ले अशी सडेताेड टीका केली. (Breaking Marathi News)

खासदार उदयनराजे भाेसले म्हणाले सातारा शहरात अनेक वर्षांपासून लाेक कामांपासून वंचित राहिले हाेते. आम्ही सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून काम करीत आहाेत. आमच्या आघाडीवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आराेप केले जात आहेत. हे सर्व कशासाठी केले जात हे मला समजत नाही. मला काेणाला नावं ठेवायची नाहीत असेही उदयनराजेंनी नमूद केले.

ज्यांच्या मनात, हदयात, स्वप्नात आणि वस्तुस्थितीत भ्रष्टाचार भिनलेला आहे. त्यांच्याबद्दल मी काही बाेलणार नाही असे सांगत उदयनराजे म्हणाले नाव ठेवणं सोपं असतं. लोकांच्या जीवावर त्यांनी संस्था स्थापन केल्या. मला बोलायचे नव्हते पण अजिंक्यतारा कुकुटपालन, बझार, महिला बॅंक हे ते.. या संस्थातील लोकांचे पैसे खाल्ले.

दुर्देवाने सांगावेसे वाटते असे लाेक एवढ्या माेठ्या घराण्यात जन्माला आले कसे. आमच्या दारात कधी काेणी आले नाही. आई बहिणीवरुन आम्हांला कधी काेणी शिव्या दिल्या नाहीत. आयुष्याची पुंजी ज्यांनी गाेळा केली हाेती ती पुंजीच त्यांनी हडप केली अशी जहरी टीका उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेवर केली. लाेकांना माहित आहे भ्रष्ट काेण आहे आणि क्रियानिष्ठ काेण आहे असेही राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT