shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara, satara political news saam tv
महाराष्ट्र

Satara : सातारकरांना मिठ्या मारणे, पप्प्या घेणे पुन्हा सुरु हाेईल; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टाेमणा

खासदार उदयनराजे भाेसले हे जेथे राहतात त्या रस्त्याची काय अवस्था आहे पहा जरा असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

Satara Political News : पालिका निवडणुक आली की सातारकरांना मिठ्या मारणे, पप्प्या घेणे असे प्रकार पुन्हा साता-यात सुरु हाेतील. त्यावेळी सातारकरांना हे आम्ही कशी पालिका चांगली चालवली हे सांगतील आणि पुन्हा निवडून द्या म्हणतील. परंतु सध्याच्या मुलभुत प्रश्नांकडे जाणिवपुर्वक सातारा विकास आघाडी आणि त्यांचे नेते देत नसल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यावर केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले माध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले सातारा पालिकेत सध्या प्रशासक आहे. परंतु सत्तेत असलेली सातारा विकास आघाडी सध्या काेणत्याही मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाहीये. (Maharashtra News)

शाहूनगर भागातील स्वच्छतेचे काम काेणाला द्यायचे त्यावरुन त्यांचे ठरत नसल्याचे आमदार भाेसले यांनी नमूद केले. दरम्यान आमदार भाेसले यांच्या टीकेस आता खासदार उदयनराजे भाेसले अथवा त्यांची सातारा विकास आघाडी काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT