ajit pawar udayanraje bhosale 
महाराष्ट्र

मला काही बाेलायचे नाही, मी काम करणारा माणूस! अजित पवार

ओंकार कदम

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत. ते रविवारी खटाव येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खासदार उदयनराजे भाेसले यांनी तुमच्या दाै-याबाबत टीका केल्याचे म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मला काहीच बाेलायचे नाही असे स्पष्ट केले. satara-political-news-ajit-pawar-udayanraje-bhosale-arayan-khan-sml80

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मला काहीच बाेलयाचे नाही. मी काम करणारा माणूस आहे. मला बाकींच्या बद्दल काहीच बाेलायचे नाही. माध्यमांचे प्रतिनिधी नेते मंडळींना विचारतात ते तुमच्या बद्दल असे बाेलले. त्यानंतर पुन्हा दुस-या नेत्याला जाऊन विचारायचे ते तुमच्या बद्दल असे बाेलले. मला विकासाशिवाय काहीच बाेलायचे नाही असे पवारांनी नमूद केले.

जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील शशिकांत शिंदे हे त्याबाबत निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याची मुभा जिल्ह्यातील नेते मंडळींना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष देत असताे असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

काेणीही असाे कायदा सर्वांना समान

दरम्यान काेणत्याही चुकीच्या घटना काेण करीत असेल तर त्यांना कायदा व नियम सारखेच आहेत. ती काेणाचीही मुले असाे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेता शाहरुख खानच्या मुलाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

SCROLL FOR NEXT