Gunaratna Sadavarten Saam TV
महाराष्ट्र

मोठ्या पोलीस बंदोबस्तात अखेर गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे!

आज सकाळी ८ वा सातारा पोलिसांचे पथक आर्थररोड कारगृहात सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी पोहचणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) काल न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना काल युक्तीवादावरुन न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. इकडे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीसकडे देण्यात आला आहे. छत्रपती उदयन राजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा फटका गुणरत्न सदावर्तेंना बसला आहे. सातार पोलिसांची (Satara Police) गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया कालच पुर्ण केली होती. आज सकाळी ८ वा सातारा पोलिसांचे पथक आर्थररोड कारगृहात सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी पोहचले होते.

सातारा पोलिसांकडून ७ ते ८ गाड्या या बंदोबस्तासाठी सोबत आहेत. अंदाजे ६० ते ७० पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्तेंना सातारा येथे नेले जात आहे. त्याच बरोबर मुंबई पोलिसांकडूनही अतिरिक्त पोलीस सातारा पोलिसांच्या मदतीसाठी तैनात ठेवले जाणार आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गे सातारा पोलीस सदावर्तेंना सातारा येथे घेवून जात आहेत. सातारा येथे दाखल होताच सदावर्तेंना स्थानिक न्यायालयात हजर करत सदावर्तेची कस्टडी वाढवून घेतली जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT