Satara Doctor Case : Saam tv
महाराष्ट्र

Satara Doctor Case : सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, मुख्यमंत्री फडवीसांनी काढला थेट आदेश

Satara Doctor death : डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आलीये. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Vishal Gangurde

सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात दोघांना अटक, पोलिस तपास वेगाने सुरू

या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्याचे आदेश आहेत.

विरोधकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी .

प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात उडालाय मोठा गदारोळ उडाला

मुंबई : साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. आतापर्यंत दोघांना अटक करून त्यांची चौकशी सुरु आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करा, असे आदेश दिले आहेत.

सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पीडित महिलेने आरोप केलेले दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून आरोपी कठोर शिक्षा देणे आणि एसआयटीची मागणी केली जात आहे. त्यानंतर आज शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पोलिस महासंचालकांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील विरोधकांकडून काय मागणी केली जात आहे?

विरोधकांनी आरोपींवर कठोर शिक्षा देण्याची आणि एसआयटीची मागणी केलीये.

एसआयटीमध्ये कोणाचे नेतृत्व आहे?

एसआयटी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून आता तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT