Satara Crime News Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News: अल्पवयीन युवकाची हत्या; कामानिमित्त घरातून गेला होता बाहेर

अल्पवयीन युवकाची हत्या; कामानिमित्त घरातून गेला होता बाहेर

ओंकार कदम

सातारा : वाई तालुक्यातील सिद्धनाथवाडी परिसरातील एका अल्पवयीन युवकाचा रात्री अज्ञाताने धारदार शास्त्राने वार करून (Crime News) खून केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. (Maharashtra News)

न्यास शिवाजी खरात (वय १७) असे मृत युवकाचे नाव आहे. न्यास खरात हा शिरवळ येथील महाविद्यालयात बारावीत (Satara) शिकत होता. बुधवारी दुपारपासून तो घरातून कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून गेला. तेव्हापासून तो घरी न आल्यामुळे रात्री नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याच्या फोनच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी (Police) रात्री सिद्धनाथवाडी परिसरात शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागत नव्हता.(Satara Crime News)

सकाळी सापडला मृतदेह

आज सकाळी त्याचा मृतदेह धोम कालव्यालगत एका शेताच्या बांधावर झाडीत आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार करण्यात आले होते. ही बातमी पसरताच सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी परिसरात गर्दी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT