Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

VIDEO : शरद पवार भाषण ऐकताना झाले भावुक, कराडमधील कार्यक्रमात नेमकं काय झालं? पाहा व्हिडीओ

Sharad Pawar: कराड येथील कार्यक्रमात मान्यवरांनी भाषणात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला.

संभाजी थोरात साम टीव्ही कराड

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आज कराड येथील सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी भाषणात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी शरद पवार भावुक झालेले पाहायला मिळाले. कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील यांचीही उपस्थिती होती.

महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या शताब्दी इमारतीच्या उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमावेळी डॉ. अनिल पाटील यांनी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय उभं करताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कशाप्रकारे मदत केली हे सांगितलं. (Latest News Update)

चेअरमन अनिल पाटील हे रयत शिक्षण संस्थेची माहिती देत होते. रयत शिक्षण संस्थेचं कामकाज, आजवर केलेली कामं, पवारांचं योगदान; याबद्दल बोलत पाटील बोलत होते.

पुण्यातील शेतकरी आणि नागरिकांनी कशी मदत केली याचा किस्साही त्यांनी सांगितला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शरद पवार यांचे डोळे पाणावले. शरद पवार यांना गहिवरुन आल्याचं पाहून उपस्थितही स्तब्ध झाले.

शरद पवार यांनी कार्यक्रमादरम्यान केंद्र सरकारवरही निशाणा साधला. केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT