Satara News Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Satara News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा

Rajesh Sonwane

सातारा : मराठा आरक्षणासाठी रोज नवीन घडामोडी व ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. नाराज असलेले (Satara) पदाधिकारी देखील मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मागणीवर ठाम आहेत. या दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी खटाव तालुक्यातील कोमल जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. (Maharashtra News)

मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांना (Manoj Jarange Patil) दोन दिवसांपूर्वी पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. त्यांना राज्यभरातून पाठींबा दिला जात आहे. यात ठिकठिकाणी आंदोलन, साखळी उपोषण केले जात आहे. तर अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. याच दरम्यान कालच मनमाड बाजार समितीच्या सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा देत मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी केली आहे. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा बांधवांंबरोबर महिलाही मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आरक्षणासाठी थेट ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देत आरक्षणाची मागणी खटाव तालुक्यातील कान्हरवाडीत करण्यात आली. कान्हरवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य कोमल जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देवुन आरक्षण प्रश्नी सरकारचं लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न केलाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणी दहा दिवसात कोट्यावधी रुपये अर्पण

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT