Satara News Saam Tv
महाराष्ट्र

Satara : साताऱ्यात राजकारण तापलं; आमदारांच्या बहिणीच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

या निवडणुकांच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गावोगावी राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळाले.

ओंकार कदम

Satara News - साताऱ्यातील (Satara) ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारण तापलं आहे. सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली तेव्हा पासूनच कोरेगाव मतदार संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकांच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गावोगावी राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळाले. (Satara Latest News)

मात्र शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची बहीण डॉक्टर अरुणा बर्गे या क्षेत्र माहुली ग्रामपंचायत निवडणुकीत गाडीत बसुन एका व्यक्तीवर चांगल्याच संतापल्या. या वेळी जमावाने गोंधळ घालायला सुरवात केली. त्यामुळे त्याठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटने बाबत बोलत असताना अरुण बर्गे म्हणाल्या, प्रचारानंतर काही माणसे भेटली त्यांच्या सोबत बोलल्यानंतर मी गाडीत जाऊन बसले त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली.

दारू पिऊन माझ्या अंगावर धावून येऊन गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी हात वर केला. मी एकटी बघून सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या अंगावर धावुन आल्याचा आरोप अरुणा बर्गे यांनी केला आहे. तसंच त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT