Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara News : लाडक्या बहिणींना दिलेली ओवाळणी हिसकावून घेण्याचे काम मविआ करतेय; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची टीका

Satara News : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक महायुती वर वारंवार टीका करत आहेत. योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

ओंकार कदम

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अर्थात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भावाकडून दिलेली ओवाळणी आहे. ती हिसकावून घेण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची जागा माझ्या सर्व लाडक्या बहिणीने दाखवावी; अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. 

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक महायुती वर वारंवार टीका करत आहेत. योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तसेच खात्यातील पैसे परत जाणार आहेत; अशा प्रकारची टीका विरोधी गटाकडून सुरू असताना (Satara News) सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. 

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही योजना अद्याप बंद झालेल्या नाहीत. पण लाडकी बहिणी योजना चालवली असल्याने आता सर्व योजना बंद पडतील; अशा प्रकारची चर्चा विरोधकांकडून सध्या सुरू आहे. असल्या विचित्र अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. युतीच्या सरकारने भाऊ म्हणून दिलेली ओवाळणी हिसकावून घेण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. सर्व परिस्थिती विरोधात असताना हरियाणामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलचे रिपोर्ट फेल ठरवण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानत असल्याचेही ते म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT