Satara News Saam Tv
महाराष्ट्र

शंभूराज देसाईंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा जलवा

शिवसेनेचा सातारा जिल्ह्यातील झंझावात आज आणखी एकदा पाहायला मिळाला.

ओंकार कदम

सातारा - शिवसेना (Shivsena) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथे निष्ठा यात्रा काढून शिवसेनिकांची मने जिंकली. शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी या निष्ठा यात्रेचे नियोजन केले होते यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते त्या मध्ये शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत होता.

हे देखील पाहा -

पाटण हा माजी गृहराज्यमंत्री आणि सद्या शिंदे गटात असणारे शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील या यात्रेला कसा प्रतिसाद मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु आज उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेचा सातारा जिल्ह्यातील झंझावात आज आणखी एकदा पाहायला मिळाला.

शिवसेना युवासेना प्रमुख माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील मल्हारपेठ येथे निष्ठा यात्रा काढली आदित्य ठाकरे यांचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. निसरे फाटा ते मल्हारपेठ दरम्यान भव्य मोटरसायकल रॅली काढत शिवसेनेच्या घोषणा देत कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी हजारो शिवसैनिक व पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NMDC Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; १९७ पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

Amitabh Bachchan : बिग बींनी स्टाफला दिलेलं दिवाळी गिफ्ट पाहून नेटकरी संतापले, म्हणाले- 'लज्जास्पद...', VIDEO व्हायरल

Hand Sanitizer Cancer Risk: वारंवार सॅनिटायझर वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Crime News : चक्रीने घात केला! ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाची आत्महत्या, काय आहे प्रकार?

Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या घरी जबरी चोरी, कपाटं फोडून चोरट्यांकडून मुद्देमाल लंपास

SCROLL FOR NEXT