satara , satara police , Visapur, Khatav, Ajaykumar Bansal saam tv
महाराष्ट्र

Satara : विसापूरच्या डबल मर्डर प्रकरणी साता-याच्या शनिवार पेठ, क-हाडच्या पार्लेतील युवकांना अटक

खून झालेल्या महिलेस दागिने घालण्याची आवड हाेती असे पाेलिसांनी सांगितलं.

ओंकार कदम

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या प्रकरणी पाेलिसांनी (police) दाेघांना अटक (arrest) केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून खटाव तालुक्यातील विसापूरच्या वृद्ध पती-पत्नीची हत्या काेणी केली असेल याचा उलगडा हाेत नव्हता. (Satara Crime News)

सातारा पाेलिस दलाने या घटनेचा कसून तपास करुन सतीश शेवाळे (खून झालेल्यांचा नातेवाईक) आणि त्याचा मित्र सखाराम आनंद मदने (पार्ले, कराड) यास अटक केल्याची माहिती एसपी अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. बन्सल म्हणाले सोन्याच्या हव्यासापोटी हा खून केला गेला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वृद्ध दांपत्याचा खून हा त्यांच्या नातेवाईकांनीच केला आहे.

आमच्यासाठी हा गुन्हा उघडकीस करणे हे माेठं आव्हान हाेते. या दाेन्ही आराेपींचे काेणत्याही स्वरुपाचे गुन्हेगारी रेकाॅर्ड नाही असेही एसपी बन्सल यांनी नमूद केले. ते म्हणाले शेवाळे हा साता-यातील शनिवार पेठेतील रहिवासी आहे. ताे संबंधितांचा नातेवाईक आहे. हा तपास करताना आम्हांला कल्पना हाेती की यामध्ये नवीन काेणी नसणार संबंधित ज्येष्ठांच्या परिचयाचा असणार आणि आमचा अंदाज खरा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही! चाणक्यांच्या 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा!

Maharashtra Live News Update: - यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे मुख्याधिकारी विरोधात मोर्चा

फ्रान्समध्ये गायींमध्ये कोरोना सदृश आजाराचा कहर, लंपीमुळे 3 हजार गायींचा मृत्यू

Mangalsutra Tradition: हातात मंगळसूत्र घातल्यानं नवरा-बायकोच्या नात्यावर काय होतो परिणाम?

भयंकर! कॉलेजमधून घरी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात २ जिवलग मैत्रिणींचा करुण अंत

SCROLL FOR NEXT