Satara Karad police bust drug racket SaamTV
महाराष्ट्र

बस ड्रायव्हरकडून मिठाईच्या खोक्यात ड्रग्ज विक्री, कराडमध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट पकडलं; मुंबई कनेक्शन समोर

Satara Crime News : कराड परिसरात ड्रग्ज विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईपर्यंतचं ड्रग्ज रॅकेटच शोधून काढून या आरोपींना अटक केली आहे.

Prashant Patil

सातारा : साताऱ्यातील कराड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आलंय. यात दोन परदेशी व्यक्तींचा देखील समावेश आहे. कराड परिसरात ड्रग्ज विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुंबईपर्यंतचं ड्रग्ज रॅकेटच शोधून काढून या आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींकडून एक लाख १४ हजार रुपयांचे ३७ ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व रॅकेट हे बसेसमधून चालवले जात असायचे. बस ड्रायव्हरकडे पाकिटातून, मिठाईच्या डब्यातून हे ड्रग्ज एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात असायचे अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT