Karad Crime News SaamTV
महाराष्ट्र

Karad Crime : 'किंग ऑफ कराड'; कराडमध्ये इन्स्टाग्राम पोस्टवरुन जोरदार राडा, तरुणाला कारमध्ये डांबून बेदम मारहाण

Satara Karad Beaten up Over Instagram Post : मारहाणीतील जखमी तरुणावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.

Prashant Patil

सातारा : साताऱ्यातील कराड शहरात वर्चस्व वादातून एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील वादावरून एका तरुणाला ८ ते १० जण्यांच्या टोळक्याकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. कारमध्ये डांबून सदर तरुणाला मारलं आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण पसरलं आहे.

मारहाणीतील जखमी तरुणावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरू आहे. जमावाकडून कोल्हापूर नाका येथील एका बारवरही दडगफेक करण्यात आली आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात सातारा एसपी समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर ठाण मांडून असून डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा संशयितांची धरपकड करत आहेत.

दरम्यान, 'किंग ऑफ कराड' या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरुन ही मारामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून शहरात संशयितांची धरपकड सुरु असून मारामारी प्रकरणात जवळपास २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT